मायलेकांचे वाद सोडविणाऱ्या महिलेला गजाने मारहाण

नगर – मायलेकांची भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला लोखंडी गजाने मारहाण झाली आहे. नगरच्या मोचीगल्लीत हा प्रकार घडला आहे. राधा ईम्रद बगळे (वय 45) यांना ही मारहाण झाली. राधा बगळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनोद व त्याची पत्नी सुवर्णा बगळे या दामप्त्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

विनोद हा त्याची आई पार्वती यांच्याशी वाद घालत होता. मारहाणही करत होता. त्यावेळी मध्यस्थीसाठी त्यांच्या नात्यातील राधा बगळे यांनी पुढाकार घेतला. विनोद याने राधा यांच्या डोक्‍यात लोखंडी गज मारला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्याने पत्नीच्या मदतीने त्याची आई पार्वती यांना देखील लोखंडी गजाने मारहाण केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाचा देवेंद्र आणि भाजी लक्ष्मी यांना देखील विनोद याने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जखमी केल्याचे राधा बगळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर विनोद याने सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. तोफखाना पोलिसांनी जबर मारहाण करणे, शिवीगाळ करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)