दुधात भेसळीसाठी रासायनिक पावडरीचा वापर

राहुरी - येथील दूध संकलन व विक्री केंद्रावरून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली रासायनिक पावडर व मिक्सर.

राहुरीतील दूध संकलन व विक्री केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नगर – राहुरीतील दूध संकलन व विक्री केंद्रावर दुधात भेसळीसाठी तीन रासायनिक पावडरांचा वापर होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत पुढे आले आहे. अण्णा खंडू ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) याच्या दूध संकलन व विक्री केंद्रावर ही कारवाई झाली आहे. या कारवाईवरून दुधात भेसळीचे छुपे कारनामे सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना राहुरीतील अण्ण ढोकणे याच्या दूध संकलन व विक्री केंद्रातील दुधात भेसळ होत असल्याची माहिती मिळाली होती. सहायक आयुक्त किशोर गोरे (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी का. सु. शिंदे यांनी सापळा रचून अण्णा ढोकणे याच्या दूध संकलन केंद्रावर बुधवारी सकाळी नऊ वाजता छापा घातला. अण्णा ढोकणे हा मिक्‍सरमध्ये पावडर घालून दुधात भेसळ करत असल्याचे समोर आले. अन्न व सुरक्षा अधिकारी शिंदे यांनी बारकाईने चौकशी केल्यावर संकलन केंद्रात चार मिक्‍सर आढळले. त्याचबरोबर तीन वेगवेगळ्या रासायिक पावडरीचे पोते सापडली.

ढोकणे याच्या दूध संकलन केंद्रातून अधिकारी शिंदे यांनी दुधाचे तीन नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. भेसळीच्या संशयावरून दूध केंद्रातील साडेतीनशे लिटरचा सुमारे साडेआठ हजार रुपये किंमतीचा दूधसाठा नष्ट केला. नऊ किलो रासायनिक पावडर जप्त केली. त्याची किंमत सुमारे 1 हजार 137 रुपये एवढी आहे. अण्णा ढोकणे याच्या दूध संकलन केंद्रावरील दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली असून, तिचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई होईल, अशी माहिती सहायक आयुक्त किशोर गोरे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)