नॉन बॅंकिंग गुंतवणूकदारांचा ठेवींसाठी धडक मोर्चा

नगर – नॉन बॅंकींग कंपन्यांमध्ये सन 2014 पासून लाखो ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी सरकारने ठोस कारवाई करून काढून द्यावेत, यामागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध कंपन्यांचे एजंट आणि गुंतवणूकदारांनी सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालुन आंदोलन केले. ठेवी न मिळाल्यास राज्यातील सर्व ठेवीदार येत्या निवडणुकांमध्ये “नोटा’चे हत्यार उपसणार, अशी घोषणा करून योग्य निर्णय न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

विलास येळवंडे, बाबासाहेब वाणी यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. जिल्ह्यातील लाखो ठेवीदारांच्या 500 कोटींहून अधिकच्या ठेवी नॉनबॅंकींग कंपन्यांमध्ये अडकल्या आहेत. एनआयसीएल 35 कोटी, मैत्रेय 200 कोटी, समृध्दी जीवन 10 कोटी, पीएसएल 19 कोटी, धनवर्षा 7 कोटी या कंपन्यांमध्ये 2014 पासून पैसे अडकले आहे. गुंतवणुकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून जिल्ह्यातील लोकांकडून ठेव पावती, आरडी (दैनदिन बचत), प्लॉट खरेदी, पेन्शन प्लॉन आदीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखून साखळी पध्दतीने ठेवी जमा करण्यात आल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2014 पर्यंत योग्य पध्दतीने परतावा दिल्यानंतर सेबीने संबंधित कंपन्यांवर कारवाई केली. यामुळे लाखो ठेवीदार, एजंटांचे पैसे अडकले. यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याविरोधात ठेवीदार व एजंटांनी सरकारला जाग आणण्यासाठी घंटानाद आणि डफडे वाजवा आंदोलन करण्यात आले. राजेंद्र साळुंके, शरद कारंडे, किरण कुलकर्णी, भागीरथ कटके, संभाजी गदादे यांच्यासह हजारो ठेवीदार, एजंट आंदोलनात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)