तर त्यांचा बंदोबस्त शेतकरीच करतील : आ. वैभव पिचड

अकोले  -पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर व अकोले मतदार संघाच्या हद्दीपर्यंत पाणी सोडण्यात आलेले आहे. तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून लाभक्षेत्राच्या बाहेरही पाणी सोडलेले आहे. तांत्रिकदृष्ट्या यापेक्षा जास्त पाणी धरणातून काढता येणे शक्‍य नाही. त्यामुळे कोणीही दबाव आणून लाभक्षेत्रातील बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा तालुक्‍यातील शेतकरीच फळ्या काढणाऱ्यांचा बंदोबस्त करतील, असा इशारा आ. वैभव पिचड यांनी दिला.

मंगळवारी (दि. 1) माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी चास येथे जाऊन 5 हजार लोकांच्या उपस्थितीत सभा घेतली होती. आज आ. पिचड यांनी आक्रमक भाष्य केले. प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये अकोले तालुक्‍यासाठी 125 दलघफू व संगमनेर तालुक्‍यासाठी 113 दलघफू इतके पाणी व लाभक्षेत्राबाहेरील गावांना पिण्यासाठी 124 दलघफू हे असे, 350 दलघफू पाणी वापरण्यात यावे, असा निर्णय झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार या आवर्तनामध्ये पिंपळगाव खांड धरणामधून 350 दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे. त्यापैकी अकोले तालुक्‍याला 100 दलघफू पेक्षाही कमी पाणी मिळालेले आहे. आमच्या हक्काच्या पाण्याचा हिशेबही देण्यात यावा. तसेच धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केलेले नसतानाही लाभक्षेत्राबाहेरील नेते आणखी पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत. याला अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे.

आपण जिल्हाधिकारी व पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंत्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यांनी पिंपळगाव खांड धरणातून यापुढे पाणी सोडण्यात येणार नाही, असे निक्षून सांगितलेले आहे. त्यामुळे कोणीही पाणी सोडण्याबाबत, तसेच बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्याबाबत शेतकऱ्यांवर दबाब आणू नये. अथवा याबाबत अफवाही पसरवू नये. असे कृत्य अकोले तालुक्‍यातील शेतकरी कदापिही खपवून घेणार नाहीत, असा इशारा आ. पिचड यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)