एमआयडीसीत स्थानिकांना हवे प्राधान्य

नगर – येथील एमआयडीसीधील कंपनींमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावा. त्यांना रोजगार द्यावा, अशी मागणी प्रातांधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आदर्श जनरल कामगार संघटनेने हे निवेदन दिले आहे.

या परप्रांतीय लोकांचे कंपन्या कुठल्याही प्रकारची कागदपत्रे व पुरावे न घेता कंपन्यांध्ये कामास घेतले जाते. तसेच जे परप्रांतीय एमआयडीसीमध्ये काम करता त्यांचे गुन्हेगार नसल्याचे प्रमाणपत्र घेतले जावे. बेरोजगार स्थानिक लोकांना काम मिळावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत आम्ही जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायतींना संघटनेतर्फे वेळोवेळी पत्र दिलेले आहे. तरीही स्थानिक लोकांना न्याय मिळाला नाही. बेरोजगारांच्या प्रश्‍नावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास संघटनेतर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

आदर्श जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सप्रे, भरत खाकाळ,योगेश आरडे, राहुल ठेंगडे, रमेश भिंगारदिवे, बाबा भोर, सचिन शिंदे, राजेंद्र मुंगसे निवेदन देताना उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)