कोरड्या घशांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले

पारनेर व संगमनेरमधील मुळा नदीकाठच्या टंचाईग्रस्तांचे धरणे आंदोलन

कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करा

अडवलेल्या सर्व बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात यावे, तीन पेक्षा जास्त ढापे कुठल्याही बंधाऱ्यावर ठेवू नयेत, प्रत्येक बंधाऱ्यावरील जास्तीचे ढापे काढल्यास सदरचे पाणी शेवटच्या मांडवे, शिंदोडीपर्यंत पोहोचणे शक्‍य आहबे. सर्व बंधाऱ्यावरील जास्तीचे ढापे पोलीस बंदोबस्तात काढून घ्यावे. अधिकारांचा गैरवापर करून पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या कार्यकारी अभियंता किरण देशमुख व उपअभियंता रामनाथ आरोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

नगर – पिंपळगाव खांड (ता.अकोले) धरणाचे पाणी पारनेर व संगमनेर तालुक्‍यातील मुळा नदीकाठच्या टंचाईग्रस्त गावांना मिळण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणानून निघाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपळगाव खांड (ता.अकोले) धरणाचे पाणी पारनेर व संगमनेर तालुक्‍यातील मुळा नदीकाठच्या देसवडे, मांडवे खुर्द, जांबुत, साकुर, पोखरी, मांडवे, बिरेवाडी, हिवरगाव, जांभुळवाडी, खडकवाडी, पळशी, शिदोडी आदि टंचाईग्रस्त गावांना मिळावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनीही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आग्रही मागणी केली होती. सदर मागणी मान्यही करण्यात आली होती.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथे 27 ऑक्‍टोबरला झालेल्या टंचाई आढावा बैठकीतही टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्याची स्पष्ट निर्देश दिले आहेत. आमदार वैभव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली 10 डिसेंबरला लाभधारक व टंचाईग्रस्त गावांच्या एकत्रित झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ही टंचाईग्रस्त शेवटच्या मांडवे, शिंदोडी गावापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झालेला होता. तरीही त्यावर कार्यवाही झाली नाही.

आमदार पिचड व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी तालुक्‍यातील असलेले व येथेच नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खालचे चार बंधारे कोरडे ठेवण्याचे कारस्थान राबविल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

साकुरचे सरपंच व संगमनेरचे सभापती शंकरराव खेमनर, भूमिपुत्र संघटनेचे संतोष वाडेकर, भाऊसाहेब डोलनर, उत्तम कुदनर, बाजीराव गागरे, रावसाहेब गोळे, सागर सुदाम, भाऊसाहेब सागर, पोपट कुदनर, रंगनाथ धुळगंड, पोपट वाडेकर, नामदेव खेमनर, भाऊसाहेब टेकडे, गुलाब भोसले, दादाभाऊ लोंढे, बाबाजी सागर, तुषार धुळगंड, लहानु खेमनर, दीपक भोसले, गोरख टेकडे, संपत दरेकर, सतीश पवार आदी ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)