विहिरीत दोन मुलांचे मृतदेह आढळले

File Photo...

कोपरगाव – वैजापूर तालुक्‍यातील सावखेडगंगा शिवारातील एका विहिरीत दोन लहान मुलांचे मृतदेह शनिवारी सायंकाळी आढळून आले आहेत. येथील नागरिकांच्या मदतीने विहिरीतून या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्या मुलांच्या अंगावर असलेल्या शर्टवरून ही मुले नगर तालुक्‍यातील जेऊर येथील एका शाळेची असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे. मात्र, रात्री उशीरापर्यंत या मुलांचे ओळख पडली नव्हती.

वैजापूर तालुक्‍यातील सावखेडगंगा येथील बापू पवार यांच्या विहिरीत सायंकाळी या मुलांचे मृतदेह आढळले. त्यानंतर येथील नागरिकांनी जवळच्या वीरगाव पोलिसांशी संपर्क साधून यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने हे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चार ते पाच वयोगटातील हे दोन्ही मुले असून यांच्या अंगावर असलेल्या शर्टवर एका शाळेचा शिक्‍का आढळून आला असून नगर तालुक्‍यातील बायजाबाई जेऊर येथील ही शाळा असल्याचे या शिक्‍क्‍यावरून स्पष्ट होते आहे. परंतू रात्री उशीरापर्यंत या शाळेशी पोलिसांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे ही मुले नेमकी त्याच शाळेची आहे का? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)