स्वामिनी पांडे हिची ‘इस्त्रो’साठी निवड

अकोले – अकोले तालुक्‍यातील कुंभेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी स्वामिनी शंकर पांडे हिची अकोले तालुक्‍यातून इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या (इस्त्रो) दौऱ्यासाठी घेतलेल्या चाचणीत तिची निवड झाली आहे. ती कुंभेफळ जि. प. शाळेचे व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शंकर पांडे यांची कन्या आहे.निवड झालेल्या मुलांच्या सहलीचा सर्व खर्च जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मीनानाथ पांडे, शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे, केंद्रप्रमुख एस. एम. मुठे, मुख्याध्यापिका सिंधूताई आरोटे-गायकवाड, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कोटकर, बेबीताई पांडे, श्रीरंग कोटकर, अमोल कोटकर, शंकर कोटकर, अण्णासाहेब कोटकर तसेच सर्व सदस्य व गावकऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)