नगरमधील वृद्धेच्या गळ्यातील 80 हजारांच्या दागिन्यांची चोरी

नगर  – महिलांच्या अचानकपणे जवळ जाऊन त्यांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याचा प्रकार शहरातील उच्चभ्रू वसाहतीत घडत आहे. आनंदनगर कॉलनीत असाच प्रकार घडला आहे.

विद्या जवाहरलाल फियोदिया (वय 59) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. विद्या फिरोदिया या आनंदनगर कॉलनीतील एका किराणा दुकानाच्या पुढे रस्त्याने जात असताना त्यांच्यासमोर एक युवक आला. त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. या युवकाने विद्या यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून घेतले. त्यानंतर त्यांना धक्का देऊन पळाला. काही अंतरावर एक युवक दुचाकी घेऊन उभा होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळसूत्र चोरून पळालेला हा युवक त्या दुचाकीवर जाऊन बसला आणि दुचाकी निघून गेली. विद्या फिरोदिया यांचे हे मंगळसूत्र सुमारे 80 हजार रुपयांचे होते. पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन झालेला प्रकार समजावून घेत, कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)