झेंडीगेट येथून सिलिंडर टाक्‍या जप्त

file pic

नगर – विनापरवाना बेकायदेशीर घरगुती वापराच्या सहा सिलिंडर कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट येथे छापा घालून जप्त केले. या सिलिंडरची 24 हजार रुपये किंमत आहे. झेंडीगेट येथील बाबा बंगाली मशिदजवळ पोलिसांनी ही कारवाई केली.

शेख आयास इलियास (रा. झेंडीगेट) याच्याविरोधात पोलिसांनी जीवनाश्‍यक वस्तू कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलीस कर्मचारी गणेश धोत्रे यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे सिलिंडरच्या विक्रीतून होणाऱ्या ग्राहकांच्या लूटीला आळा बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)