मोफत शिबिरे ही काळाची गरज – कळमकर

नगर – आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो वैद्यकीय सेवा महाग असल्याने ती न घेण्याकडेच आपला कल असतो अश्‍या शिबिराच्या माध्यमातून नकळतपणे कामगारांना या सेवा घेत असल्याने त्यांचा त्यांना नक्कीच फायदा होईल आजची आरोग्य सेवा महाग होत असतांना अश्‍या शिबीराच्या माध्यमातून रुग्णांना ती मोफत मिळत आहे. डेपोतील कामगारकरीता एक वरदानच ठरत आहे.अश्‍या शिबिरे होणे ही काळाची गरज आहे याकरीता शिवप्रेमी प्रतिष्ठान व डॉ अजिंक्‍य म्हसे करत असलेले प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले

शिवप्रेमी प्रतिष्ठान व पुणे येथील प्रसिध्द छाती विकार तज्ञ डॉ अजिंक्‍य म्हसे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्जेपुरा येथील एस टी विभागीय कार्यशाळामधील कामगाराची मोफत छाती रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विभागीय कार्यशाळा प्रमुख एनईओ सुनिल कोल्हे तर प्रमुख पाहुणे माजी महापौर अभिषेक कळमकर हे होते यावेळी अड प्रशांत दारकुंडे,अमित दारकुंडे माधव गलांडे, शिवाजी देवकर, उपयंत्र अभियंता एस सी देवरे, भांडार अधिकारी स्वप्निल वारे तसेच डेपोमधील कामगार नेते एकशिंगे,उत्तमराव रणशिंग, शिवाजी कडूस,सुरेश चौधरी आदी उपस्थित होते या शिबिरात रूग्णांची तपासणी करण्यात आली

कोल्हे म्हणाले की, ध्वनीप्रदुषण,हवेचे प्रदुषण यांचा कामगाराच्या शरीरावर परीणाम होतो नकळतपणे श्‍वासाचे , विविध आजार होतात जीवनमानाची बदलती पद्धती, कामाचा ताण, खान-पानातील बदल, व्यायामाचा अभाव यामुळे प्रत्येक जणास काही ना काही तरी आजार निर्माण होत असतो. त्यासाठी नियमित व्यायाम आणि तपासणी होणे आवश्‍यक आहे. यामुळे कामगारांची काम करण्याची गती कमी होते यामुळे या शिबीरांचा कामगारांना निश्‍चितच फायदा होईल कोल्हे म्हणाले की,कामगारांनी काम करताना धूळ,धूर पासून बचावाकरीता मास्कचा वापर करावा तसेच दमा,कर्करोग यांची वेळच्या वेळी तपासणी करावी जेणेकरून पुढील त्रासापासून बचाव होउन वेळीच चांगले उपाय केल्याने आपली तो रोग आटोक्‍यात आणता येईल

प्रशांत दारकुंडे म्हणाले की, ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाप्रती आपले काही तरी देणे लागतो या उदात्त हेतूने आम्ही कामगाराची तपासणी करत आहोत सातत्याने असे उपक्रम करणार आहोत. सुत्रसंचालन उत्तमराव रणशिंग यांनी केले आभार अमित दारकुंडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिवप्रेमी प्रतिष्ठानचे सदस्य,कार्यशाळेचे कर्मचारी आदीनी परीश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)