बंद घराचे कुलूप तोडून सुमारे दीड लाखांची चोरी

संगमनेर – मुलाला भेटण्यासाठी दोन दिवस पुण्याला गेलेल्या अनिल प्रभाकर दिवटे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत दिवटे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील मालदाड रस्त्यावरील रहिवासी भाग असलेल्या महालक्ष्मी कॉलनी येथे दिवटे यांचे घर आहे. सोमवार दि. 17 ते 19 दरम्यान ते आपल्या मुलाला भेटण्यासाठी पुण्याला गेले असता यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे 1 लाख 46 हजार रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने, चांदीचे साहित्य, कॅमेरा यांसह सात हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळवून नेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगमनेर शहर पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा रजि क्र. 444/18 भादंवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोनि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोनि. निकम करीत आहेत. संगमनेर शहरासह तालुक्‍यात वारंवार होणाऱ्या घरफोड्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)