आत्मदहन अतिरेकच, पण तौसीफला न्याय पाहिजेच : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांची मागणी : अतिक्रमणांच्या “त्या’ फाईलवरच्या दबावाची चौकशी व्हावी

नगर  – आत्मदहन आंदोलनात मयत झालेल्या तौसीफ हासीम शेख याला न्याय मिळाला पाहिजे. न्यायालयाचा निकाल तौसीफच्या बाजूने आहे. मग अतिक्रमणांवरील कारवाईला सात महिन्यांची दिरंगाई का? अतिक्रमणांच्या त्या फाईलवर कोणते राजकीय दबाव होते का? स्थानिक अधिकाऱ्यांनी काय शेरे मारले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून अतिक्रमण हटविण्यांसाठी आत्मदहन करणे हा अतिरेकीपणा आहे, असेही भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्जतमधील दावल मलिक ट्रस्टच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमणे हटविण्यासाठी तौसीफ हासीम शेख या युवकाने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतः आत्मदहन केले. तौसीफ या आंदोलनात गंभीर भाजला होता. सुमारे 80 टक्के भाजलेला तौसीफ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश आंबेडकर नगर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत त्यांचे या मुद्याकडे लक्ष वेधले.

आंबेडकर म्हणाले, “”तौसीफला न्याय मिळाला पाहिजे. त्याने न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. तिथे न्याय मिळाला. निकाल त्याच्या बाजूने लागला आहे. प्रशासकीय पातळीवर कारवाईसाठी तो धडपडत होता. सहा ते सात महिन्यांपासून या अतिक्रमणांवर कारवाई होत नव्हती. परिणाम तौसीफ याचा बळी गेला.”

तौसीफ याचा प्रशासनाने बळी घेतला आहे, असा आरोप करून प्रशासनावर कोणाचा दबाव होता का? त्याने आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यावर त्याच्यावर पोलिसांनी वॉच ठेवला पाहिजे होता. यात तसे झाले नाही. तौसीफ याने आत्मदहनाचे कृत्य म्हणजे अतिरेकपणा होता, असेही ते म्हणाले.

न्यायालयाचा निर्णय होऊन देखील त्यावर कारवाई झाली नाही, हाच मोठा गुन्हा आहे. त्याचे काय? असाही प्रतिप्रश्‍न आंबेडकर यांनी यावेळी केला. अतिक्रमणांच्या त्या फाईलवर कोणाचा दबाव होता? अधिकाऱ्यांनी ऍक्‍शन न घेण्यामागचे कारण काय? ते अतिक्रमणे कोणाची होती. त्यात राजकीय कार्यकर्ते कोणाचे होतं? त्यांना बळ कोण देत होतं? या सर्व मुद्यांची चौकशीची मागणी आंबेडकर यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)