पत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा

नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन

नेवासा फाटा – मतदान व अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार संदीप रोडे यांना मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी नेवासा तालुका एकता पत्रकार संघांच्यावतीने नेवासा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ होत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जर पोलीस प्रशासन कायदा हातात घेऊन असे कृत्य करीत असेल तर सामान्य नागिराकांसोबत कसे वागत असतील असा सवाल निर्माण झाला आहे. नायब तहसीलदार नारायण कोरडे यांना नेवासा तालुका पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक दरंदले, मकरंद देशपांडे, उपाध्यक्ष सुहास पठाडे, गुरुप्रसाद देशपांडे, सुनील गर्जे, संदीप वाखुरे, राजेंद्र वाघमारे, संदीप गाडेकर, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन गायकवाड, पवन गरुड, सचिन दसपुते, रमेश पाधले, गणेश बेल्हेकर, विजय खंडगळे, किरण चंदेल, गांधारे भाऊसाहेब, शामराव मापारी आदी पत्रकार उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)