दिघी शाळेस बजाज यांच्याकडून फर्निचर भेट

कर्जत – राशिनचे उद्योजक मेघराज बजाज यांनी दिघी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस फर्निचर भेट दिले. त्याबद्दल शाळेत त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक औदुंबर निंबाळकर होते. शाळेला वेळोवेळी मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

मेघराज बजाज व सर्व कर्मचारी यांचा शाळा व ग्रामस्थांच्यावतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी शाळेला 4 टेबल, 2 कपाटे व 5 खुर्च्या भेट दिल्या. यावेळी मेघराज बजाज यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. त्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंजीर महारनवर, सदस्य सोमनाथ महारनवर, भाऊसाहेब मचाले, रंगनाथ पवार, दत्तात्रय खरात, ग्रामस्थ चंद्रकांत निंबाळकर, रोहीत निंबाळकर, योगेश देवकर, निखिल इंगळे, दीपक साळुंके, महावीर महारनवर, राजेंद्र खरात, अशोक निंबाळकर, अजित महारनवर, दादा मंडलिक, व इतर ग्रामस्थ व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका स्वाती जाधव, शिक्षक तात्याबा भिसे, सुभद्रा भिसे, ज्ञानदेव जाधव, संदीप कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन वैष्णवी महारनवर, श्रुती निंबाळकर व श्रुती भोईटे यांनी केले.आभार विद्यार्थिनी वैष्णवी महारनवर हिने मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)