नगर तालुक्‍यातील 84 हजार बालकांचे लसीकरण करणार

डॉ. मांडगे : पाच आठवडे चालणार मोहीम

नगर – गोवर-रुबेला लसीकरण मोहीम देशव्यापी असून, शाळा व बाह्यसंपर्क लसीकरणाच्या माध्यमातून गोवर व रुबेलापासून बालकांचे रक्षण करण्यासाठी नगर तालुक्‍यातील 84 हजार 129 बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. तरी पालकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी केले.

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस नगर तालुक्‍यात प्रारंभ झाला आहे. यावेळी डॉ. मांडगे म्हणाल्या, या मोहिमेत 9 महिने ते 15 वर्षांच्या आतील बालकांना लस देण्यात येणार आहे. नगर तालुक्‍यातील 84 हजार 129 लाभार्थी असून तालुक्‍यात एकूण 370 शाळा, 580 अंगणवाड्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुक्‍यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्र व चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालय व तालुक्‍यातील 111 गावांत ही मोहीम पाच आठवडे चालणार आहे. यासाठी गावागावांत गेल्या तीन महिन्यांपासून प्रसार व प्रचार चालू आहे.

लसीकरणापासून वंचित राहिलेली कुटुंबे शोधून काढण्यासाठी आरोग्य विभागाला मदत करण्याचे आवाहन पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, उपसभापती कोकाटे, गटविकास अधिकारी अलका शिरसाठ, गटशिक्षण अधिकारी रामदास हराळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मांडगे, बालविकास प्रकल्प अधिकारी पवार, कुलकर्णी, देशमुख यांनी केले आहे.

“गोवर हा प्राणघातक रोग आहे. तो संसर्गजन्य आजार असून, खोकणे व शिंकणे याद्वारे होतो. न्यूमोनिया, अतिसार व मेंदूसंसर्ग, तापासोबत त्वचेवर लालसर पूरळ, खोकला, नाकातून पाणी वाहने व डोळे लाल ही गोवरची सामान्य लक्षणे आहेत.
-डॉ. ज्योती मांडगे,नगर तालुका आरोग्य अधिकारी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)