नगर-सोलापूर मार्गावर खड्डे

File photo

कर्जत – तालुक्‍यातील माहीजळगाव येथील नगर-सोलापूर व त्याला छेदून जाणाऱ्या कर्जत-जामखेड रस्त्यांमुळे झालेल्या चौफुल्यावर मोठा खड्डा पडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या खड्ड्यात पडल्याने अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे, तर वाहन कोंडीमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

तरी संबंधित विभागाने सदर चौफुलीवरील खड्डा त्वरित बुजवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते केशव घोडके यांनी दिला आहे. यावेळी किशोर कोपनर, भारत घोडके, जयराम साबळे, योगेश जाधव उपस्थित होते.

-Ads-

तालुक्‍यातील माहीजळगाव येथे नगर-सोलापूर मार्ग आणि त्याला छेदून जाणाऱ्या कर्जत-जामखेड रस्त्यामुळे चौफुला बनला आहे. या चारही मार्गावर वाहनांची नियमित मोठी वर्दळ असते. मात्र चौफुल्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे.त्यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

तसेच दुचाकीस्वार या खड्ड्यांमुळे पडून काही जणांना गंभीर दुखापत तर, काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तरी सदर खड्डा बुजविण्यात यावा अशी मागणी घोडके यांनी केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)