कोल्हार खुर्द गावामध्ये डॉ. आंबेडकरांना अभिवादन

कोल्हार खुर्द – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजात रुजल्यास समाज सक्षम होईल, असे प्रतिपादन राहुरी तालुक्‍यातील कोल्हार खुर्द येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशिअल फोरमचे जिल्हा अध्यक्ष संजय भोसले यांनी केले.

डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हार खुर्द येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  भोसले म्हणाले, आज भारत देशाची वाटचाल ही राज्यघटनेवर आधारित सुरु असून या राज्यघटनेचे जनक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांचे विचारच आज देशाला तारू शकतात, हे विचार समाजात रुजल्यास अखंड भारत देश सक्षम होऊ शकेल.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी श्रीरामपूर विभागाच्या मोटार वाहन सहायक निरीक्षक आलेशा शेख, एस. एफ. गायकवाड, अनिल शिरसाठ, सुनील तांबे, प्रकाश चिखले, ज्येष्ठ नागरिक संघांचे लक्ष्मण थोरात, आर पी. आय. चे सतिष चक्रे, नितीन भोसले, गणेश लाटे, भाऊसाहेब भोसले, सुधीर भोसले, कैलास भोसले, फ्रान्सिस भोसले (गुरुजी ) महिपती शिरसाठ, थॉमस भोसले उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)