जिल्हास्तरीय ‘खो-खो’ स्पर्धेत आत्मा मालिक प्रथम

कोपरगाव – नगर येथील एकलव्य क्रीडा मंडळ व जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय किशोर, किशोरी खो-खो स्पर्धेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 45 व्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो निवड चाचणीसाठी जिल्हा संघात आत्मा मालिकच्या प्रीतेश पावरा, विकास पावरा, हृषीकेश काळे, पल्लवी पावरा, शीला चव्हाण, किरण वसावे या खेळाडूंची निवड झाली.

सदर निवड चाचणी 5 ते 9 डिसेंबरदरम्यान जळगाव येथे होणार आहे. विकास पावरा या खेळाडूला अष्टपैलू खेळाडू, तर प्रीतेश पावरा यास उत्कृष्ट आक्रमक खेळाडू हा वैयक्‍तिक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक गणेश म्हस्के, अण्णासाहेब गोपाळ, धनंजर दातीर, रवींद्र नेंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

-Ads-

या खेळाडूंचे भारतीय खो-खो संघटनेचे सहसचिव प्रा. चंद्रजित जाधव, राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे, उपाध्यक्ष अशोक पितळे, निर्मलचंद्र थोरात, संत देवानंद महाराज, संत परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्‍वस्त वसंतराव आव्हाड, प्रकाश भट, प्रभाकर जमधडे, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, क्रीडा विभाग प्रमुख अशोक कांगणे, अजित पवार यांनी अभिनंदन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)