थोरातपेक्षा डॉ. विखे कारखान्याकडून 25 रुपये भाव जास्त – कैलास तांबे

file photo

लोणी – संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याकडून आजवर जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्यात आला. यंदाही या कारखान्याने 2 हजार 500 रुपये भाव जाहीर केला होता. त्यापेक्षा 25 रुपये भाव जाहीर करून आता पद्‌मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याने सन 2018-19 या वर्षांत गळीतास येणाऱ्या ऊसाला 2 हजार 525 रूपये इतका भाव देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपाध्यक्ष कैलासराव तांबे यांनी दिली. आतापर्यंत जाहीर झालेल्या ऊस भावाचा विचार केला तर डॉ.विखे पाटील कारखान्याचा भाव हा सर्वाधिक असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.

-Ads-

पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळीत घालून दिलेल्या विचारांचे अनुकरण करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची परंपरा डॉ.विखे पाटील कारखान्याने सुरू ठेवली असल्याकडे तांबे यांनी लक्ष वेधले.

यावर्षी ऊसाची असलेली कमतरता, नैसर्गिक अडचणी, लक्षात घेऊन गळीत हंगाम यशस्वी करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले असून, यावर्षीच्या गळीत हंगामाचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)