एफआरपीसह 200 रुपये दर न मिळाल्यास कारखाने बंद पाडणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा; प्रादेशिक सहसंचालकांना निवेदन

नगर – मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या एफआरपीसह 200 रुपये भाव ऊस उत्पादकांना अदा करण्याचे आदेश साखर कारखान्यांना द्यावे, तसेच कारखान्यांनी त्यानुसार भाव दिला नाही तर जिल्ह्यातील साखर कारखाने बंद पाडण्यात येतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी सघटनेच्यावतीने आज देण्यात आला.

-Ads-

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक (साखर) संगीता डोंगरे यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, दिनेश वराळे, सुनील इंगळे, हेमंत वने, आसीफ पटेल, सतीश पवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांनी मागील हंगामामध्ये एफआरपी दिलेली आहे. परंतु महसूल उत्पन्न वाटप सूत्र (70-30) नुसार ऊस दर दिलेला नाही, तसेच या वर्षीचा गाळप हंगाम सुरू होवून महिना झाला, तरी ही बहुतेक साखर कारखान्यांनी तुटलेल्या उसाला मुख्यमंत्र्यांनी एफआरपीसह 200 रुपये जाहीर केलेला आहे.

दि. 28 ऑक्‍टोबर रोजी ऊस उत्पादकांच्या विराट ऊस परिषदेमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी त्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मागील हंगामातील 70-30 फॉर्म्युल्यानुसारची उर्वरित रक्कम, तसेच या हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाला एफआरपीसह 200 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने अदा करावेत. तसा आदेश साखर कारखान्यांना द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

साखर कारखान्यांनी आठवडाभरात ही कार्यवाही न केल्यास नगर जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद पाडले जातील व स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)