गुरुकुल स्कूलमध्ये गोवर-रूबेला लसीकरण

गोपाळपूर – माळेवाडी ( ता. नेवासे) येथील गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये आरोग्य विभागातर्फे गोवर, रूबेला लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 120 मुलांना लस देण्यात आली. गोवर, रुबेला लसीकरणाचा शुभारंभ सरपंच वंदना कुंढारे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय नाबदे, शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. ए.आर.बारवाल, इ.पी.थोरात, ए.एस.वैद्य, परिचारिका उंदरे, घोडके, मुळे, जाधव, बिरंगळ,सोमनाथ आसणे शाळेचे शिक्षक सचिन टाक, सोनाली आंबेकर, सुरेखा जाधव, मिनाक्षी मते, जयश्री गव्हाणे, सुनंदा मोरे, बाळासाहेब गणगे, संतोष गढेकर आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थीच्या पालकांनी निमंत्रित करण्यात आले होते.

-Ads-

यावेळी विद्यार्थी पालक सचिन लंघे, अशोक शिंदे, बाळासाहेब ढोकणे, अमोल शेळके, शबाना सय्यद, राहुल ढोकणे, भिमाबाई आगळे, जालिंदर सरोदे, निलेश देशमुख, सुभाष नाबदे, प्रविण इंगळे, अमोल हारदे, संजय आंबेकर आदी पालक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय नाबदे यांनी गोवर-रुबेला आजारामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मुले या आजारामुळे त्रस्त आहे, यामुळे सर्व पालकांनी दक्ष राहुन मुलांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)