गव्हाणेवाडी शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा

-सुमारे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त; अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची कारवाई

श्रीगोंदा  – तालुक्‍यातील गव्हाणेवाडी शिवारातील एका हॉटेलच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात 39 जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी व चारचाकी वाहने असा सुमारे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

-Ads-

याबाबत सविस्तर असे की, तालुक्‍यातील गव्हाणेवाडी शिवारात हॉटेल जय मल्हारच्या मागे असलेल्या बंद शेडमध्ये मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मीना यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मीना यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा छापा टाकला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकास उत्तम कारखिले यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या छाप्यात अविनाश रसाळ, नवनाथ भोसले, हानिप आतार (सर्व रा. टाकळीहाजी ता. शिरूर), अनिल सुपेकर, भाऊसाहेब उचळे, सलिम पठाण, गजानन ठुबे, शिवराम श्रीमंदिलकर, भगवंत लामखडे (सर्व रा. निघोज, ता. पारनेर), आनंद भिंगारदिवे, रोहित बिडे (रा.भिंगार, नगर), योगेश सुपेकर, संतोष फसले (रा. केडगाव), अमित कापडे, प्रदीप पवार, बाळू सदावर्ते, आयुष शेख, घनश्‍याम वर्मा, माऊली शिवणकर, बाबासाहेब वाघमारे, विनायक वाघमारे (सर्व रा. नगर), अमीन शेख (रा.पुणे शहर), पोपट गायकवाड, भाऊसाहेब ढवळे (रा. धवळगाव), पोपट माळी (रा. देवीभोयरे, ता. पारनेर), कैलास भोसले (रा.सरदवाडी), कोंडीभाऊ पवार (रा.अन्नापुर), प्रदीप तिवारी, शिवा दिवेकर, विजय गव्हाणे, महेश गायकवाड, अनिल चव्हाण, खंडू खोमणे, संजय भंडारे, ज्ञानेश्वर शेलार, प्रकाश गव्हाणे, नितीन पोळ (सर्व रा.शिरूर) या 39 जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.

या छाप्यात पोलिसांनी 2 लाख 77 हजार 760 रुपये रोख, 6 चारचाकी आणि 13 दुचाकी, जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 13 लाख 97 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई रामेश्वर घुगे हे करीत आहेत.

तक्रार करूनही दुर्लक्ष

तालुक्‍यात वाळूतस्करी, जुगार, हातभट्टी आदी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. याबाबत श्रीगोंद्यातील महसूल प्रशासन, श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रारी करून देखील अपवाद वगळता मोठ्या कारवाया होत नाहीत. आता मात्र अतिरिक्त पोलीस अधीक्षक मीना यांनी श्रीगोंदा तालुक्‍यातील वाळूतस्करीसह इतर अवैधधंदे “टार्गेट’ केले आहेत. गेल्या महिन्याभरात मीना यांची तालुक्‍यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्‍यातील अवैधधंदे मीना यांच्या “रडार’वर आले असून अवैधव्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)