दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता – मगर

वाघुंडे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

अन्‌ स्मशानभूमीचा झाला कायापालट…

सुपे जिल्हा परिषद गटातील वाघुंडे खुर्द गावामध्ये ग्रामनिधी अंतर्गत 5 लाख रुपये खर्च करून, स्मशानभूमी व श्री दत्त मंदीर परिसरात झाडांना ओटे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे, यास रंगकाम करण्यात आले आहे. परिसरात हायमॅक्‍स दिवे बसविल्याने परिसर उजळून निघाला आहे. स्मशानभूमी व दत्त मंदीर परिसरात पेव्हींग ब्लॉकचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्यावतीने विविध झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले असून, त्याचे चांगल्या प्रकारे संगोपन केले असल्याने परिसर हिरवाईने नटला आहे.

सुपे – निवडणुकीदरम्यान ग्रामस्थांना विविध विकासकामांचे आश्वासन दिले होते, ते आश्वासन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेवून वेळेत पूर्ण करता आले, याचे समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन सरपंच संदीप मगर यांनी केले.

-Ads-

पारनेर तालुक्‍यातील वाघुंडा खुर्द येथे जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या हस्ते जनसुविधा योजने अंतर्गत 4.5 लाख रुपये खर्चून स्मशाणभूमी सुशोभीकरण लोकार्पण व लोकवर्गणीतून दत्त मंदीर परिसर, बाळानंद स्वामी विद्यालयासमोर रस्ता कॉंक्रिटिकरण, पायऱ्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन राणीताई लंके व उपसभापती दीपक पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच मगर बोलत होते.

“जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे व राणीताई लंके यांनी ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दत्त देवस्थान ट्रस्टसाठी 10 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. गावातील विविध विकास कामांसाठी लोकनेते निलेश लंके यांचे वाघुंडे खुर्द गावातील विकासासाठी नेहमीच झुकते माप आहे.
– संदीप मगर,सरपंच, वाघुंडे खुर्द

यावेळी पंचायत समिती उपसभापती दीपक पवार, उपसरपंच सुनीता मगर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका राजश्री शिंदे, ग्रामविकास अधिकारी रेणुका भोर, सेवा सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब मगर, डॉ.मगर, संतोष पवार, रामदास मगर सर, रंगनाथ पवार, दत्तात्रय मगर, उपनेते दादा शिंदे, बाळासाहेब पवार, गंगाराम पवार, शुभम शिंदे, बाळासाहेब औचिते, सचिन वाढवणे, प्रविण पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)