नगर – पक्षकारांमधील तंटे आपसात फिरत्या न्यायालयाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पक्षकार आणि वकिलांनी सहकार्य करावे. सहमतीने खटले मिटल्यास एकमेकांमध्ये गोडवा निर्माण होतो. फिरत्या लोक अदालतच्या माध्यमातून न्याय आपल्या दारी योजनेतून प्रत्येक दारापर्यंत न्याय घेऊन जाण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश सुहास माने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात फिरत्या लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रधान जिल्हा सत्र न्यायधीश रमेश देशमुख यांच्या हस्ते सोमवारी (दि.3) झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश सुहास माने बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा प्राधिकरणाचे सचिव न्या. पद्माकर केस्तीकर, सरकारी वकिल सतिष पाटील, मध्यवर्ती वकिल संघाचे अध्यक्ष जयंत भापकर, बार असो.चे उपाध्यक्ष गजेंद्र पिसाळे, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य ऍड.शिवाजी कराळे, विक्रम वाडेकर, निर्मला चौधरी, लता वाघ यांच्यासह पक्षकार आणि वकिल उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा