दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, चार जखमी 

जामखेड – जामखेड जवळील नगर रस्ता व खर्डा रस्त्यावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. श्रीकृष्ण कल्याण जाधव उर्फ बामदळे (वय 30, रा.बामदळेवडा ता.पाटोदा,जि.बीड) व विलास प्रकाश मगर (वय 25, लेन्हेवाडी, ता. जामखेड) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पहिला अपघात हा मंगळवारी (दि. 4) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जामखेड नगर रस्त्यावरील हिमालय पेट्रोल पंपाजवळ घडला. यामध्ये दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात श्रीकृष्ण कल्याण जाधव उर्फ बामदळे हा जागीच ठार झाला तर अशोक रंगनाथ चव्हाण (वय 24 रा. पाटोदा. जि. बीड) व मनोहर डोके (वय 45) व त्यांचा मुलगा हनुमंत मनोहर डोके (वय 18 रा.आष्टी.जि.बीड) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. चौघांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्‍टरांनी श्रीकृष्ण जाधव यास मृत घोषित केले.

-Ads-

ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली, त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. जखमीवर जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमीतील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यास नगर येथे पाठविण्यात आले आहे.

तर दुसरा अपघात बुधवारी (दि.5) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास खर्डा रोडवरील लोहाराची देवी जवळ घडला. विलास प्रकाश मगर (वय 25 रा लेन्हेवाडी, ता. जामखेड) व त्याचा मित्र अनिल (बाबा) तुकाराम राळेभात हे आपल्या कामानिमित्त सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल वरून जामखेडहून खर्डा या ठिकाणी चालले होते. याच दरम्यान जामखेडहून येणारा ट्रक देखील खर्ड्याकडे चालला होता. ही दोन्ही वाहने लोहाराची देवीच्या पुढील चढावर आली असता मोटारसायकल ट्रकला ओव्हरटेक करत असतानाच समोरुन येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलने हुलकावणी दिली, त्यामुळे पहिल्या मोटारसायकलवरील विलास मगर व अनिल राळेभात हे खाली पडले.

मात्र याचवेळी ट्रक च्या मागील चाकाखाली विलास मगर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा अनिल (बाबा) तुकाराम राळेभात हा जखमी झाला. विकास मगर याचे दिडच वर्षांपुर्वी लग्न झाले असुन त्याच्या मागे पत्नी, भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. विलासच्या मृतदेहाची ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)