स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात चार तास ठिय्या

शेवगाव – प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा लक्ष्मी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुकळी ग्रामस्थांनी शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारात गावातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधातील विविध मागण्या साठी सुमारे चार तास ठिय्या आंदोलन केले.

नायब तहसीलदार मयुर बेरड, पुरवठा अधिकारी नितीन बनसोडे यांनी आंदोलनकर्त्यांशी केलेल्या चर्चेनंतर बनसोडे यांनी संबंधित स्वस्तधान्य दुकानाची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

स्वस्थ धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करुन अन्य दूकानदाराकडे वितरणाची जबाबदारी देण्यात यावी, सर्व कार्डधारकांना ऑनलाईन पद्धतीने (बायोमेट्रीक) त्वरीत धान्य वितरण करण्यात यावे, अपंग व वृध्दांना घरपोहच रेशन मिळावे, दि.21 नोव्हेंबरच्या ग्रामसभा ठरावाची त्वरित अमलबजावणी करावी आदी मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार मयुर बेरड यांनी स्विकारले.

या आंदोलनात प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शेवगाव तालुकाध्यक्ष निलकंठ कराड, दक्षता समितीचे अध्यक्ष सुरेश भवर, सरपंच पार्वती भवर, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप बामदळे, संजय नाचन, देवदत्त साळवे, ज्ञानेश्वर घोडके, गणेश सावंत, भानुदास भवर,शशीकला दिलवाले, जयाबाई व्हटकर, सिताबाई गरड, हिराबाई गरड, मोहन गरड, लहु भवर आदिसह सुकळी गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)