सक्षम भारत निर्माणासाठी दुर्बल घटकांना प्रोत्साहन द्यावे

सुशिला मोडक : वसतीगृहातील विद्यार्थ्यांची दंत तपासणी करुन, स्वच्छता कीटचे वाटप

नगर – सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी रामकरण सारडा वसतीगृहातील विद्यार्थ्यांची दंत तपासणी करुन, त्यांना स्वच्छता कीटसह कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच उत्तम आरोग्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

-Ads-

कार्यक्रमाचे उदघाटन सुशिला मोडक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रकल्प प्रमुख अर्चना खंडेलवाल, सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, मोनिका ताथेड, सारिका मुथा, मंजू झालाणी, अंजली महाजन, अर्चना कुलकर्णी, वृषाली दंडवते, सोनाली लोढा, लता राजोरिया, रेखा सेठी, मिनू बन्सल, निशा अग्रवाल, पल्लवी शहा, अनुजा जाधव, ममता अग्रवाल, अंजली राठी, वृषाली भगत, तारा भुतडा आदींसह फाऊंडेशनच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात जागृती ओबेरॉय यांनी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आनण्यासाठी सेवाप्रीत कार्यरत आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्यावर लक्ष देऊन विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व महिलांनी एकत्र येऊन उभारलेले हे सामाजिक संघटन असून, या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
सुशिला मोडक म्हणाल्या की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे.

आर्थिक परिस्थिती अभावी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम सेवाप्रीतच्या महिला सदस्या करीत आहे. सक्षम समाज व भारत निर्माणासाठी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असल्यास त्यांची सर्वांगीण प्रगती होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

वसतीगृहातील विद्यार्थ्यांची दंत तपासणी डॉ.स्नेहल कुलकर्णी, डॉ.पायल धूत, डॉ.अलका त्रंबके यांनी केली. 33 विद्यार्थ्यांना दातांच्या विकार सबंधी मोफत उपचाराची जबाबदारी उपस्थित डॉक्‍टरांनी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोजेक्‍टरवर दात उत्तम राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, दंतविकारावरील उपाय व मौखिक आरोग्याचे महत्त्व विशद करणारे व्हिडिओ दाखविण्यात आले.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते टॉवेल, टुथब्रश, टुथपेस्ट, पावडर, नेलकटर, साबण आदी 10 साहित्याचा समावेश असलेल्या स्वच्छता किटचे प्रत्येक विद्यार्थ्यांस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनू बनसळ यांनी केले. आभार संतोष खंडेलवाल यांनी मानले. सारिका मुथा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करुन कार्यक्रमाचा समारोप झाला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)