विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : वाकचौरे

अकोले – हिवरगाव आंबरे येथे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य व भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी दिली. हिवरगाव आंबरे येथे वाकचौरे व पंचायत समिती सदस्य नामदेव आंबरे यांच्या उपस्थितीत जि. प. प्राथमिक शाळेची कुंपणभिंत, इमारत, स्मशानभूमी संरक्षक भिंत, हायमस्ट दिवे आदींचे उद्‌घाटन करण्यात आले.

त्यावेळी वाकचौरे बोलत होते. याप्रसंगी सरपंच बेबीताई आंबरे, उपसरपंच ज्ञानेश्वर रेवगडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील नाईकवाडी, संगीता रेवगडे, नजमा पटेल, बेबी कदम, अलका मधे, शिवाजी बोंबले, ग्रामसेवक जे. डी. राहाणे, भाजप नेते माधव ठुबे, सेवा संस्थेचे अध्यक्ष जनार्दन आंबरे, भाजप युवामोर्चा सरचिटणीस सुनील उगले, अरुण नाईकवाडी, मारुती रेवगडे, गुरुप्रसाद रेवगडे, दत्तात्रय पारदी, बंडू वाकचौरे, अस्मिता ठुबे, शकुंतला गोर्डे, एन. डी. नाईक, नामदेव कदम, रावसाहेब नेहे, पंडित आंबरे इत्यादी ग्रामस्थ व शिक्षक बहुसंख्यने उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)