भोजापूर धरणातून पोलीस बंदोबस्तात सोडले पाणी

टप्प्याटप्प्याने गावांना सोडणार पाणी

संगमनेर तालुक्‍यातील सहा गावांसाठी 16 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, नियोजनानुसार पहिल्यांदा डाव्या कालव्याद्वारे शेवटच्या टोकाला असलेल्या सोनेवाडी व पिंपळे बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी दिले जाणार आहे. सुमारे 12 दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरू राहणार आहे.

संगमनेर – भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची वेळ इतिहासात पहिल्यांदाच प्रशासनावर आली. आर्वतन सोडण्यापूर्वी पूर्व भागातील बंधाऱ्यात पाणी सोडण्यावरून पेच निर्माण झाला होता. मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नियोजनानुसार ठरलेल्या गावांना पाणी सोडण्यात आले. सिन्नर व संगमनेर तालुक्‍यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

भोजापूर कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन 27 नोव्हेंबर रोजी भोजापूर धरणातून लाभक्षेत्रातील गावांसाठी 120 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 27 नोव्हेंबर रोजी सोडण्यात येणारे आवर्तन लांबले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी सकाळी वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एस. गोंदकर यांनी धरण पसिररात संवेदनशील भागाची पाहणी केली. यावेळी संगमनेर तालुका भोजापूर पाटपाणी संघर्ष समिती अध्यक्ष हरिश्‍चंद्र चकोर उपस्थित होते.

शनिवारी चार वाजता 25 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात धरणातून 70 क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. 12 दिवस लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन चकोर यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)