नो ड्यूज’ प्रकरणी मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

नगर – महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांकडे थकबाकी असतांनाही त्यांना “नो ड्यूज’चे प्रमाणपत्र देण्यात आल्याच्या प्रकाराची महापालिका आयुक्तांनी गंभीर दाखल घेतली आहे. या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीची चौकशी करण्यात आली असून थकबाकी असतांनाही “नो ड्यूज’ देणाऱ्या राजेंद्र शिरसाठ व मोहन काळे दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उपायुक्त प्रदीप पठारे यांनी याबाबत आदेश बजावले आहेत.

छाननी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात थकबाकी असल्याचे आक्षेप घेण्यात आले. मुळात “नो ड्यूज’ तपासणी शिवाय अर्जच स्वीकारला जात नाही. सर्व उमेदवारांनी अर्ज भरतांना “नो ड्यूज’ व अतिक्रमण नसल्याचे दाखले जोडलेले आहेत. त्यानंतरही तक्रारी येवून मालमत्ताकराची थकबाकी व अतिक्रमण असल्याचे छाननीवेळी सिध्द झाले.

-Ads-

काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कुठलीही तपासणी न करताच “नो ड्यूज’ प्रमाणपत्र दिल्याचे समोर आल्यामुळे याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. महापालिकेने “नो ड्यूज’चे दाखले देणाऱ्या सर्वांनाच नोटीसा बजावून म्हणणे मागवले होते. त्यानंतर माळीवाडा प्रभाग कार्यालयातील मुख्य लिपिक राजेंद्र शिरसाठ व बुरुडगाव प्रभाग समिती कार्यालयातील लिपिक मोहन काळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

नो ड्यूज प्रकरणामुळे महापालिकेची चांगलीच नाचक्‍की झाली होती. उच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले होते. त्यामुळे याची गंभीर दखल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतली. या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी चौकशी करून लगेच संबंधित दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)