महामार्गावर लूटमार करणाऱ्या श्रीरामपूरच्या चौघांना अटक

नगर  – महामार्गावर प्रवाशांना अडवून त्यांची लूटमार करणाऱ्या श्रीरामपूरमधील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तनवीर छोटू शहा (वय 26, रा. झिंगरेमळा), सोनू मून्नर भिंद (वय 21), असीफ खाजा शेख (वय 35), राजेश गणेश गहेरे (वय 24, सर्व रा. गोंधवणी रोड, ता. श्रीरामपूर) असे अटक केलेल्यांची नावे आहे. तनवीर शहा हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर संगमनेर, सोनई, नाशिक, राहुरी आणि नगर तालुक्‍यातील पोलीस ठाण्यांमध्ये लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदशनाखाली पोलिसांनी या चौघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. राजस्थान येथील रंगलालाराव फौजमल राव (हल्ली रा. नेवासे) व त्यांचे मित्र प्रवीण लालराम राव यांना या टोळीने लुटले होते. नेवाशातून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर हा प्रकार 28 नोव्हेंबरला यांना लुटले होते. मोटारगाडीतून आलेल्या पाच जणांनी या दोघांना मारहाण करत पिस्तुलचा धाक दाखवून 25 हजार लुटले होते. या लुटीमागे श्रीरामपूर येथील तनवीर शहा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने त्याच्या साथीदारांची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांना अटक केली आहे. पोलिसांनी या चौघांकडून 20 हजारांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात येणारी तीन लाख रुपयांची मोटारगाडी जप्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)