ट्रॅक्‍टर उलटून दोघांचा मृत्यू

कोपरगाव – येथील पुणतांबा चौफुली येथे जनार्दन स्वामी मंदिराजवळ शेतात ट्रॅक्‍टर उलटून चालक व सहायकाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 3) सकाळी सातवाजेच्या दरम्यान घडला. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

याबाबत अमित साहेबराव खोकले (रा. गांधीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सकाळी सात वाजता जनार्दन स्वामी मंदिराजवळील आढाव यांच्या शेताजवळून ट्रॅक्‍टर (क्र. एमएच- 41 एए- 6953) भरधाव वेगाने शिर्डीकडे जात होता. रस्ता खराब असल्याने ट्रॅक्‍टर उलटला.

या अपघातात चालकासह अन्य एका इसमाचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अमर गवसणी हे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)