शिंगवे तुकाई ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन

शिंगवे तुकाई (ता. नेवासे) : पाणीपुरवठा सुरू करा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

पाणी योजना सुरू करण्याची मागणी : लोकप्रतिनिधीं विरोधात घोषणाबाजी

नेवासा – नेवासा तालुक्‍यातील शिंगवे तुकाई येथील ग्रामस्थांनी पाणी योजना सुरू करावी, या मागणीसाठी 100 फूट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. पाण्याच्या प्रश्‍नावर ग्रामस्थ दोन दिवसांपासून उपोषणला बसले होते. परंतु लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले. तसेच लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी केली.

-Ads-

शासनाने 20 कोटी रुपये खर्च करुन चांद्यासह 5 गावे आणि 15 वाड्यांसाठी उभारलेली पाणी योजना वीजबिलाअभावी ऐन दुष्काळात बंद पडली आहे. त्यामुळे 20 ते 22 हजार लाभधारकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. चांदा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरळीत करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शिंगवे तुकाई येथील तुकाई देवी मंदिरात दोन दिवसांपासून उपोषण सुरु केले होते. आज तिसऱ्यादिवशी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

या योजनेत सामाविष्ट असणारी 5 गावे व 15 वाड्या कायमस्वरुपी दुष्काळी आहेत. चांद्याचा काही भाग सोडला, तर सर्व परिसर कायमस्वरुपी दुष्काळी आहे. या योजनेत चांदा, शिंगवे तुकाई, मांडे मोरगव्हाण, राजेगाव, लोहारवाडी या पाच गावांसह पंधरा वाड्यांचा सामावेश आहे.

पाणी मिळेपर्यंत हे उपोषण सोडणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. चांदा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे 18 लाख 60 हजार रुपये वीजबिल थकीत असल्याने ही योजना बंद असल्याने लोकप्रतिनिधी आणि शासनाने त्वरीत दखल घेऊन पाणी योजना सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)