सुलतानपूर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वाघ

भावीनिमगाव – शेवगाव तालुक्‍यातील सुलतानपुर ( मठाचीवाडी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे आगामी दोन वर्षांसाठी पुनर्गठण करण्यात आले. यात अध्यक्षपदी संतोष वाघ यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण घाडगे यांच्या निवडी करण्यात आल्या.

तर सदस्यपदी सविता आबासाहेब शिरसाठ, मीरा नारळकर, सविता जगदाळे, छाया जगदाळे, उषा पवार, अशोक वाघ, ज्ञानेश्वर मांढरे, देविदास सुबूगडे यांच्या निवडी करण्यात आल्या तर, ग्रामपंचायत सदस्य गिता आत्माराम घोडखिंडे, शिक्षक तज्ञ म्हणून डॉ. दत्तात्रय बाबुराव वाघ, तर गुंड मोहन – शिक्षक सदस्य, आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नागे समिक्षा मच्छिद्र व ढाकणे सागर नवनाथ यांच्या नियुक्त्‌या करण्यात आल्या.

-Ads-

यावेळी सरपंच सतिष धोंडे, मुख्याध्यापक रघुनाथ लबडे, माजी सभापती बाळासाहेब धोंडे, विष्नूपंत जगदाळे, संजय जगदाळे, आबासाहेब वाघ, सेवा सोसायटी अध्यक्ष बबन जगदाळे, शालेय शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)