शॉर्टसर्किटने अडीच एकर ऊस जळून खाक

संगमनेर – तालुक्‍यातील मांडवे बुद्रुक येथील तुळशीराम नाथा मेमाणे या शेतकऱ्याचा अडीच एकर ऊस शेतावरून गेलेल्या महावितरणच्या वीजवाहिन्यांचे शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. ही घटना शनिवार दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

येथील मेमाणे यांच्या गट नंबर 529 मध्ये उसाची लागवड करण्यात आलेली आहे. शेतावरून गेलेल्या महावितरणच्या वीजवाहिन्यांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्याने उसाला आग लागली. आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

-Ads-

मात्र आग आटोक्‍यात न आल्याने अडीच एकर उस जळून खाक झाला. दरम्यान घटनेची माहिती समजताच महावितरण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)