कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा पेटला

नगरपरिषदेच्या गुळगुळीत भूमिकेने नागरिक त्रस्त; परिसरातील महिलांनी डेपोला ठोकले टाळे

श्रीगोंदे – शहरातील कचरा गोळा करून ज्या ठिकाणी टाकला जातो, त्या साळवनदेवो परिसरातील त्रस्त नागरिकांसह महिलांनी शनिवारी कचरा डेपोला टाळे ठोकत आक्रमक भूमिका घेतली. या राहिवाश्‍यांनी डेपोमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल अनेकदा नगरपरिषदेचे लक्ष वेधत आंदोलने केली. मात्र दरवेळी करू, पाहू, सांगतो अशी आश्वासने देत नगरपरिषदेकडून वेळकाढू भूमिका घेतल्याचा आरोप करीत या रहिवाश्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या.

-Ads-

शहरातील कचरा गोळा करून येथील डेपोत आणून टाकला जातो. अनेकवेळा कचरा पेटून देण्यात येतो. धुराच्या लोटामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या डेपोच्या संरक्षण भिंती कमी उंचीच्या असल्याने मोकाट कुत्र्यांनी या परिसरात उच्छाद घातला आहे.

अनेक वर्षांच्या या त्रासाने नागरिक हतबल झाले आहेत. या आंदोलकर्त्यांनी एकदा हा कचरा पालिकेत आणून पेटून दिला होता. संबंधित ठेकेदार यावरील उपाययोजनांची अंमलबजावणी करीत नसल्याने हा प्रश्न उद्भवत आहे. एकतर उपाय योजना करा नाही तर, कचरा डेपो बंद करा, ही मागणी लावून धरत परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दौलत जाधव, अविनाश ढेरे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांना बोलावून घेतले. दातीर यांनी एक महिन्यात संरक्षण भिंतीची उंची वाढवण्याचे काम सुरू करण्यात येईल व इतर समस्यांवर उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक नाना कोथिंबीरे, नाना शिंदे, विनोद होले आदींसह नागरिक व महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)