महामार्गावरील अतिक्रमण धारकांनी घेतला धसका

अमरापूर-बारामती महामार्गाचे काम प्रगतिपथावर

मिरजगाव – अमरापूर-बारामती या महामार्गाचे 171 किलोमीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू असुन, या होणाऱ्या चौपदरी महामार्गामुळे बीड, नगर, पुणे जिल्ह्यातील महामार्गावरील लहाऩ-मोठ्या गावातील अतिक्रमनधारकांनी धसका घेतला असून, आपली घरे या अतिक्रमनातून वाचतील काय? या विवंचनेत अतिक्रमणधारक पडले आहेत.

अमरापूर-बारामती या महामार्गाचे काम मोठ्या प्रगती पथावर सुरू झाले असल्याने, पाथर्डी, धामणगाव, कडा, मिरजगाव, चिंचोली काळदात, कर्जत, राशिन, खेड, भिगवण आदी गावातील रस्त्यालगत असणाऱ्या स्वमालकीच्या असो, अथवा अतिक्रमनधारकांच्या राहण्याच्या व व्यवसायीकांच्या अतिक्रमनावर हातोडा पडणार असल्याने या अतिक्रमणधारकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

मागील पाच वर्षापूर्वी आघाडी सरकारच्या काळामध्ये याच महामार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसा पाठवून पंधरा दिवसांच्या मुदतीनंतर संबंधित विभागाने सकाळी सात वाजताच आपला लवाजमा व पोलीस फैजफाट्यासह मिरजगावमधील कडारोड, नवीपेठ, क्रांतीचौक आदी महामार्गावरील हातोडा टाकण्याअगोदरच पहाटे आमदार राम शिंदे येऊन बसले, त्यावेळी ना. राम शिंदे हे विरोधी पक्षातले आमदार होते. परंतु आतातर ते याच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे आता पालकमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आता लोकसभा, विधानसभा काही महिण्यांवर येऊ पहात असतांनाच मतदाराच्या घरावर हातोडा पडणार असल्याने, ज्यांनी मागील पाच वर्षापुर्वी वाचविले तेच, आता आपले घरे पाडणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)