दुष्काळी कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

संग्रहित छायाचित्र.....

पाथर्डी – पाथर्डी तालुक्‍यावर दुष्काळाचे भीषण संकट कोसळले असून प्रशासनाकडून दुष्काळ निवारण्याचे कार्य प्रभावीपणे हाती द्यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दुष्काळाचे प्रभावीपणे काम होत नसल्याने सत्ताधारी भाजपने प्रशासनावर रोष ठेवून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

तहसीलदार पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी भाजप सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. प्रशासनाकडून दुष्काळ निवारण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. रोजगार हमीचे कामे सुरू करावीत, जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, वाडी वस्ती व तांड्यावर जेथे टॅंकर पोचू शकत नाहीत. तिथे पाण्याची व्यवस्था करावी आदींचे नियोजन करून दुष्काळग्रस्त लोकांना दिलासा देण्याची गरज आहे.

-Ads-

तसेच काही परिसरामध्ये पावसाअभावी पेरणी न झाल्यामुळे शासनाने सरसकट विमा मंजूर करावा व शासनाच्या दुष्काळी भागासाठी योजना आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या काळात प्रशासनाकडून कुठलीही दिरंगाई होणार नाही. याची दक्षता घेतली जाईल. तसेच चारा छावण्या व पाणीटंचाईबाबत प्रशासनाकडे अहवाल पाठवून वस्तीवर पाणी पोहोचण्याची व्यवस्था केली जाईल’, मागेल त्याला रोजगार हमीचे काम उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.

शिष्टमंडळात गुलाब शेख, नितिन एडके, नवनाथ वाघ, सदाशिव मरकड, रामदास मरकड, अंबादास घुले, सोपान बडे, मच्छिंद्र जायभाय, अण्णासाहेब ढाकणे, पोपट शिंदे, आदिनाथ धायतडक, बबन मोरे आदीं सहभागी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)