30 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदान – आ. डॉ. तांबे

संगमनेर  – गेल्या अनेक वर्षांपासून पगारापासून वंचित असणाऱ्या राज्यातील विनाअनुदानित खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना अखेर दिलासा मिळाला असून, राज्यभरातील सुमारे 30 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना येत्या दोन महिन्यांत 275 कोटी रुपये अनुदानापोटी मिळणार असल्याची माहिती आमदार. डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.
विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार डॉ. तांबे यांसह

सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांची बैठक संपन्न झाली. यावेळी राज्यातील शाळांच्या अनुदानाबाबत आमदार डॉ. तांबेंसह इतर आमदारांनी शासनाकडे मागणी केली. यावेळी तपासाअंती पात्र ठरणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तसेच 1 हजार 279 शाळा व 1 हजार 867 तुकड्यांमधील 9 हजार 901 शिक्षक, 411 शिक्षकेत्तर कर्मचारी व 11 अर्धवेळ शिक्षकांना याचा लाभ होणार आहे.

-Ads-

तसेच 20 टक्के अनुदान सुरू केलेल्या शाळांना पुढील वेतन अनुदान देणे, अनुदानास पात्र ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देणे, यासर्व बाबींसह राज्य सरकारने 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या दोन महिन्यांत याबाबतची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निधीची तरतूद केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)