शेवगावात अकरावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

शेवगाव – शिक्षणासाठी शेवगाव येथे भाडोत्री खोली घेऊन राहात असलेल्या मुंगी येथील अकरावीच्या विद्यार्थिनीने आज गुरुवारी (दि.29) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दिपाली सुखदेव ठोंबरे (वय 16) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक भरत काळे पुढील तपास करत आहेत .

यासंदर्भात नवाब कादर शेख (रा. शेवगाव, विद्यानगर) यांनी शेवगाव पोलिसांत अर्ज देऊन घटनेची माहिती दिली. दिपाली ही अर्चना सुधाकर हिंगे व रिजवाना मीर साहब बेग या एसटी कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुलीसमवेत भाडेकरू म्हणून शेख यांच्या खोलीत राहत होती. आज सकाळी 8.45 वाजता शेख दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. तर अर्चना हिंगे व रिजवाना बेग याही कामावर गेल्या होत्या. खोलीत दिपाली एकटीच होती.

साडेनऊच्या सुमारास ऋतुजा उद्धव नरवडे ही तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी आली, तेव्हा दिपालीने पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे तिला दिसले, तिने आरडाओरड केल्यानंतर दिपालीने आत्महत्या केल्याचे समजले. शेख यांनी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.

ठाणे अंमलदार सहायक फौजदार भाऊसाहेब गिरी यांनी नोंद घेतली. सपोनि नितीन मगर यांनी दिपालीच्या वडिलांना बोलावून घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)