महापौर कदम यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात तक्रार

नगर – महापौर व शिवसेनेच्या उमेदवार सुरेख कदम यांच्या उमेदवारी अर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रिजवाना नफीस चुडीवाले यांनी ही तक्रार केली आहे. अॅड. शिरीष देशपांडे यांच्यामार्फत ही तक्रार करण्यात आली आहे.

महापौर कदम यांचे अतिक्रमण, बांधकाम अनाधिकृत आहे. कर थकबाकी आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु त्यावर कारवाई झाली नाही. याबाबत तसे कागदोपत्री पुरावे सादर केले होते. या तक्रारीवर कोणतेही स्पष्टीकरण न देता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी महापौर कदम यांचा अर्ज वैध धरला.

-Ads-

या सर्व पुराव्यांच्या कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात दाखल करत, महापौर कदम यांचा अर्ज बाद करण्याची मागणी चुडीवाले यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)