बेलापुर-परळी रेल्वेसाठी पुन्हा उपोषण

कुकाणे – बेलापुर-परळी रेल्वे मार्गाचा सर्वे रिपोर्ट जून 2018 पर्यंत रेल्वे बोर्डाला पाठविण्याचे रेल्वे उपमहाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी दिलेले लेखी आश्वासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालण्याचे लेखी आश्वासनाला वर्ष पूर्ण होऊनही आश्वासनाची पूर्ती न झाल्याने कुकाणे ( ता. नेवासा) येथील नागरिकांनी पुन्हा 1 डिसेंबर 2018 पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या रेल्वे मार्गासाठी गेल्या वर्षी 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2017 असे आठ दिवस कुकाणे येथील नागरिकांनी उपोषण केले होते. यावेळी रेल्वेचे उपमहाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी जुन 2018 पर्यंत सर्वे रिपोर्ट पाठविण्याचे तसेच मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालतो असे लिखित अश्वासन दिले होते. परंतु जून 2018 ची मुदत संपुनही रिपोर्ट न गेल्याने पुन्हा कुकाणा व परिसरातील नागरिकांनी 2 ऑगष्ट 2018 रोजी मंत्रालय मुंबई येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावर महाप्रबंधक डि. के. शर्मा यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना सप्टेबंर 2018 पर्यंत अहवाल पाठविण्याचे लिखित दिले.

“रेल्वे महाप्रबंधक व मुख्यमंत्री यांच्याकडून जनतेची व लोकप्रतिनिधींची फसवणूक झाली आहे. या विरोधात कुकाणे येथे पुन्हा 1 डिसेंबर पासून उपोषण करणार आहे. याची सर्व जबाबदारी शासनावर राहील.
-रितेश भंडारी, कुकाणे.

ही मुदत संपल्यानंतर प्रमुख उपोषणकर्ते रितेश भंडारी यांनी अहवालाबाबत विचारणा केली असता, दि. 10 ऑक्‍टोबर रोजी सर्वे प्रगतीपथावर असल्याचे उत्तर मिळाले. परंतु प्रत्यक्षात कुठेच काही नाही. हे लक्षात आले. या सर्व प्रकारावरून आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणुकीमुळे शासनाच्या व रेल्वेच्या विरोधात जनतेत चिड निर्माण झाली आहे.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा उपोषणाचा एल्गार पुकारला आहे. या उपोषणाचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे महाप्रबंधक मुंबई, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिक्षक अ नगर, जिल्हाधिकारी अ. नगर, पोलीस निरीक्षक नेवासा, तहसीलदार नेवासा यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर रितेश भंडारी, अप्पासाहेब वाबळे, रंगनाथ पंडित, राधेशाम बोरुडे, प्रभाकर खंडागळे, सुरेश वाबळे यांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)