संविधानामुळे सर्वसामान्य जनता सुरक्षित

पाथर्डी – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे सर्वसामान्य जनता देशात सुरक्षित असून बलाढ्य लोकशाही राष्ट्र म्हणून भारताला जगात ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी केले.

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला. मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सतीश तरटे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे होते. यावेळी युवा नेते प्रशांत शेळके, विजय उनवणे, भागचंद पठे, संतोष इंगवले, सचिन केळगॅंद्रे, सनी दिनकर, प्रमोद कुमठेकर आदी उपस्थित होते.

गर्जे म्हणाले की, राष्ट्रीय कायदा दिवसाला संविधान दिवस म्हणूनही ओळखले जाते. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान समितेने संविधान स्वीकार केले आणि ते 26 जानेवारी 1950 ला लागू करण्यात आले. या दिवसाच्या सन्मानार्थ दरवर्षी आपण 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणले जाते, त्यांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट 1947 ला संविधान मसुदा समितीची स्थापना झाली. जवळपास 2 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाचा मसुदा विधानसभेत सादर करण्यात आला.लोकशाहीसाठी संविधान काळाची गरज होती. संविधानामुळे आज प्रत्येक नागरिक भारतात आनंदाने जगत आहे. यावेळी मुंबईत 26 /11 रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)