पीककापणी प्रशिक्षणात अधिकारी गुंतले मोबाईलवर!

नगर : पीककापणी प्रशिक्षण वर्गात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लेणारे मार्गदर्शक करत असताना समोर बसलेले बहुतांशी अधिकारी त्यांच्याकडील मोबाईलमध्ये गुंतले होते.

नगर – जिल्हाधिकारी कार्यालयात रब्बी हंगाम 2018 मधील पीककापणी प्रयोगाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्ग झाला. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे हा वर्गात देण्यात येणारी माहिती महत्त्वाचीच होती. या वर्गात कृषी, महसूल, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. परंतु या प्रशिक्षणाचे गांभीर्य यात सहभागी झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नसल्याचे दिसून आले. प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेले बहुतांशी अधिकारी आणि कर्मचारी आपआपल्या मोबाईलमध्ये डोके खुपसून होते. प्रशिक्षण देणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लेणारे यांनी देखील या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे सांख्यिकी विभागीय सहायक कांतीलाल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सांख्यिकी तंत्र अधिकारी बाळासाहेब नितनवरे, आर. के. गायकवाड, सतीश शिरसाठ, कृषी विकास अधिकारी सु. रा. राठी, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण सोनवणे, अन्सार शेख यांच्यासह महसूल, कृषी व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पीक कापणीच्या आकडेवारीसाठी मोबाईल ऍपचा वापर करावा लागणार

जिल्ह्यातील एकूण 9 पिकांना पंतप्रधान पीकविमा योजना लागू आहे. महसूल यंत्रणेतील ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी पीक पाहणीच्या नोंदी वेळेवर कराव्यात. त्यची माहिती संबंधित शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यासाठी वेळेवर उपलब्ध करून द्यावी. संबंधित खात्याच्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांनी पीक कापणी प्रयोगाचे काम, ग्रामस्तरीय समिती सदस्यांच्या उपस्थितीत पूर्ण करावे. पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी पीक कापणी प्रयोगांवेळी उपस्थित राहून दक्षता घ्यावी. स्वयंचलित हवामान केंद्राची पाहणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी. त्या ठिकाणचे अक्षांश व रेखांश बाबतची माहिती वेळेवर सादर करावी, अशा सूचना प्रशिक्षण वर्गात करण्यात आल्या. पीककापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरच पीकविमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई दिली जाणार आहे. निवडलेल्या प्लॉटमधील पिकाची कापणी करतेवेळी 100 टक्के मोबाईल ऍपचा वापर करावा लागणार आहे.

सकाळी सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गातील अधिकारी खूपच घाईत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लेणारे मार्गदर्शन करत होते. परंतु समोर बसलेले अधिकारी हे मोबाईलमध्ये गुंतले होते. काही जणांनी स्वतः मोबाईलमध्ये शेजारच्यांचे देखील डोके खुपसून घेतले होते. त्यामुळे प्रशिक्षणाची धारच निघून गेल्याचे दिसत होते. पंडित लेणारे यांनी देखील याप्रकाराकडे दुर्लक्ष केले.

“जिल्ह्यात मागील खरीप हंगामात पीक विमा योजनेचे सर्व यंत्रणांनी चांगले काम केले आहे. चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातही कृषी विभाग, महसूल विभाग व जिल्हा परिषदमधील ग्रामस्तरावरील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी पीकविमा योजनेच्या कामासाठी दक्ष राहवे. शेतकऱ्यांना सदर योजनेबाबत सर्वतोपरी सहकार्य करावे.
– पंडित लेणारे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)