गुन्हेगारांना नवरात्रोत्सव काळात करणार तडीपार

राशीन (ता. कर्जत)- येथील जगदंबा देवी नवरात्रोत्सवानिमित्त मार्गदर्शन करताना पोलीस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे.

राशीन – जगदंबा देवी नवरात्रोत्सव काळात राशीनसह जवळपासच्या गावांमधील ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांना या काळात तडीपार करणार आहे.या कालावधी जर कोणी दिसलास त्यांना अटक केली जाईल,असा इशारा पोलीस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांनी दिला आहे.

राशीन येथे जगदंबा देवी नवरात्रोत्सवानिमित्त शांतता व नियोजनची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंडे बोलत होते. ते म्हणाले की, देवीच्या मंदिरात पावित्र राखा, यात्रा काळात गुंडगिरी, दादागिरी, महिलांची छेडछाड करणारे दिसल्यास ताबडतोब पोलिसांकडे तक्रार करा, तसेच तक्रार पेटीही ठेवण्यात येणार आहे.

-Ads-

पालखी रथावरती सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात येतील तसेच पालखी रथाभोवती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. यासाठी नवरात्रोत्सवा काळात 175 पोलीस कर्मचारी व 40 महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. असे मुंडे म्हणाले.

प्रांताधिकारी अर्चना नष्टे म्हणाल्या, पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन, यात्रा कमिटी, आरोग्य विभाग, वीज वितरण, एस.टी. महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत या विभागांनी पूर्व तयारीचा अहवाल सादर करावा असे सांगितले. तसेच गैरहजर अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी दर्शनबारी, लाईट, रस्ते, जादा बसेस, दिशादर्शक फलक, पिण्याचे पाणी, वाहनांची पार्किग व्यवस्था, मानकऱ्यांची ओळखपत्र, दर्शनासाठी सर्वांना समान न्याय आदी विषयावर चर्चा झाली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, जगदंबा देवी ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख, शहाजी राजेभोसले, संभाजी राजेभोसले, कुळधरणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष शिंदे, सहायक अभियंता वीज वितरण कुणाल देकाटे, किरण पोटफोडे, मनोज बोरा, सुभाष रेणूकर, मधुकर दंडे, नितीन कानगुडे, औदुंबर देवगांवकर, शरद शेटे, बापू गंगावणे ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे यांनी मानले .

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)