येसवडी चारी पाणीप्रश्नावर युक्रांदचा पुढाकार

कर्जत : येथील तहसील कार्यालयात युक्रांद व येसवडी कुकडी चारी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

धालवडीत शेतकऱ्यांची बैठक : टेलपर्यंत पाण्यासाठी संघर्षाची भूमिका

येसवडी, बारडगाव, करमनवाडीत चाऱ्या कोरड्याच

धालवडी, तळवडी भागात आवर्तन पोहोचले. टेलच्या येसवडी, बारडगाव दगडी, करमनवाडीत भागात आवर्तन न पोहोचल्याने चाऱ्या कोरडेठाक पडल्या आहेत. येथील पिके अंतिम घटका मोजत आहेत. पुढील काही दिवसात आवर्तन न पोहोचल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रा. अशोक पावणे यांनी दिला आहे.

कर्जत – येसवडी कुकडी चारीला टेलपासून हेडपर्यंत पूर्ण दाबाने आवर्तन मिळत नसल्याच्या प्रश्नावर युवक क्रांती दलाच्या पुढाकारातून शनिवारी धालवडी येथे शेतकऱ्यांची बैठक झाली. चारीला टेलपर्यंत पाणी न पोहोचल्यास विविध आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी सह्यांचे निवेदन करून तहसील कार्यालयात देण्यात आले.

-Ads-

येसवडी कुकडी चारी संघर्ष समितीचे अध्यक्ष बापूराव सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कुकडी आवर्तनाच्या प्रश्नावर डॉ. कुमार सप्तर्षी प्रणित युवक क्रांती दलाचे सहकार्यवाह आप्पा अनारसे, रवी लाटे, कमलाकर शेटे, रोहनसिंह गायकवाड, किरण पोटफोडे, विनोद सोनवणे, शुभम पानसरे आदींनी पुढाकार घेतला.

धालवडी सेवा संस्थेचे चेअरमन मोहन सुपेकर यांनी हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका मांडली. आप्पा अनारसे, रवी लाटे, बंडू सुपेकर, किरण जगताप यांनी आवर्तनाच्या प्रश्नावर विविध मुद्दे मांडले. बैठकीसाठी अरुण तांबे, बंटीराजे जगताप, दत्तात्रय पवार, शिवाजी पवार, ज्ञानदेव सुपेकर, सुखदेव खोडवे, उत्तम कापसे, कांतीलाल खोडवे, सतीश खोडवे, शरद तांबे, लालासाहेब खोडवे, हनुमंत पवार, संदीप होळकर, बाळासाहेब चव्हाण, तात्यासाहेब चव्हाण, लक्ष्मण चव्हाण तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

संचारबंदीचा आदेश ही दडपशाहीच : आप्पा अनारसे

मल्ल्‌या, निरव मोदी यांना मोकाट सोडून शासन आंदोलन केले म्हणून, शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहे. सध्या कुकडी चारीच्या परिसरात संचारबंदीचे आदेश देण्यात आल्याचे समजते. ही शासनाची दडपशाहीच आहे. सत्याग्रही मार्गाने युक्रांद नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आप्पा अनारसे यांनी बैठकीत स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)