कंपनीतील शिसे चोरीत बोल्हेगावातील टोळी

नगर – एमआयडीसीत बंद असलेल्या कंपनीतून शिसे चोरीत बोल्हेगाव (ता. नगर) येथील युवकांची टोळी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीकडून 1 लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त केले आहे.

दीपक रवीकांत उपाध्ये (वय 24), उत्तम लाजरस तोरणे (वय 36), भीमा सोपान मिरगे (वय 27), आकाश भाऊसाहेब डाके, सुदीप बापू चंदशिव (वय 18) व निखील साहेबराव जाधव (वय 20, सर्व रा. बोल्हेगांव, ता. नगर) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

-Ads-

साहिल विजय पुरस्सावाणी (रा. गुलमोहोर रोड) यांची कंपनीतून अडीच लाख रुपयांचे शिसे चोरी झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांकडे दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे सहकारी या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.

बोल्हेगावातील खबऱ्यांकडून पोलिसांना या चोरीत दीपक उपाध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने इतर पाच जणांची नावे सांगितले. या सहा जणांनी पोलिसांच्या चौकशीत गुन्हा केल्याची माहिती दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)