हद्दपारीच्या कारवाईतील उमेदवारांना बॉंडसह हजेरी

प्रांताधिकारी यांनी 138 जणांना हद्दपार केले

नगर  – जिल्हा प्रशासनाने आज केलेल्या हद्दपारीच्या आदेशात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या उमेदवारांना अटी-शर्ती घातल्या आहेत. 50 हजार रुपयांचा बॉंड प्रातांधिकारी यांच्याकडे सादर करून निवडणुकीच्या कालावधीत स्थानिक पोलीस ठाण्यात दररोज हजेरी द्यायची आहे. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान कोठे असणार आहेत, याचाही माहिती देण्यास बंधनकारक असणार आहे. प्रातांधिकारी उज्वला गाडेकर यांनी काढलेल्या या आदेशामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.

-Ads-

प्रातांधिकारी उज्वला गाडेकर यांनी आज 138 जणांविरोधात हद्दपारीचा आदेश काढला आहे. या आदेशात अनेक जण निवडणुकींच्या रिंगणात आहे. त्यांना अटी-शर्ती देत हद्दपारीच्या काळात नगर शहरात राहता येणार आहे.

किशोर डागवाले, गणेश भोसले, मयूर बोचूघोळ, स्वप्नील शिंदे, रवींद्र वाकळे, सुभाष लोंडे, वैभव वाघ, मुकेश गावडे, वैभव वाघ, गणेश हुच्चे, शिवाजी कदम, संभाजी कदम, योगेश सोनवणे, अनिल जाधव, एजाज सय्यद, तुषार कोतकर, मोबीन सय्यद, संतोष शिंदे, आसाराम कावरे, अभिजीत भगत, आजित कोतकर, आण्णासाहेब शिंदे, मतीन सय्यद, महेश आहेर, विनोद निस्ताने, दिनेश सैंदर, अजय चितळे, प्रशांत ढापसे, कोंडिराम नेटके, गौरव मुनोत, दिंगबर गेंट्याल, खान मेहबूब उस्मान आदींना या अटी-शर्ती देण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)