विनापरवाना खोदकामप्रकरणी रिलायन्सला 50 लाखांचा दंड

संग्रहित छायाचित्र

अधिकारी व पदाधिकारी यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा संशय!

नगर – नगर तालुक्‍यातील बुऱ्हाणनगर, नागरदेवळे, जेऊर, वारुळवाडी, कापूरवाडीसह इतर ग्रामपंचायत हद्दीत रिलायन्स कंपनीमार्फत रस्त्यांतर्गत ग्रामपंचायतीची परवानगी न घेता रस्ते खोदाई सुरु होती. याबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र विधानमंडळात तारांकित प्रश्‍न झाल्यानंतर रिलायन्स कंपनीने तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये 50 लाख रुपये जमा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी दिली.

याबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य आमदार अनिल बाबर यांनी याबाबत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. यामध्ये नगर जिल्ह्यात रिलायन्स जिओ कंपनीच्या वतीने अनाधिकृतपणे केबल टाकून लाखो रुपयांच्या महसुलाची चोरी होत असल्याबाबत प्रश्‍न होता. याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन रिलायन्स जिओ कंपनीने नगर तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायतींच्या तसेच जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता तसेच शासनाचा महसूल कर न भरता रस्ते खोदकाम करुन मोठ्या प्रमाणात केबल टाकण्याचे काम केले होते.

याबाबत अमोल जाधव यांनी 8 ऑक्‍टोबर रोजी नगर तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती. ही कामे त्वरित बंद करावीत. तसेच सदर कंपनीवर कायदेशीर कारवाई करणेबाबत तसेच संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती.

विधिळात तारांकित प्रश्‍न उपस्थित झाल्यामुळे जिल्हा व पंचायत समिती प्रशासनात एकच खळबळ झालेली होती. याबाबत जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रिलायन्स जिओ कंपनीला दोन नोटिसा देऊन खुलासा मागितलेला आहे, पंचायत समितीने विस्तार अधिकाऱ्यांची चौकशीचे आदेश देऊन तालुक्‍यातील किती ग्रामपंचायतीना जिओ कंपनीने रक्‍कम जमा केलेली आहे, याबाबतचा अहवाल विधिमंडळात पाठविलेला आहे.

नगर तालुक्‍याप्रमाणे जिल्ह्यातही रिलायन्स जिओने विना परवानगी अनेक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागांची परवानगी न घेताच व कोणतीही रक्‍कम ग्रामपंचायतीला न देता, महसूल कर न भरता कामे दिलेली आहेत. यामध्ये काही सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पंचायत समितीमधील काही पदाधिकारी,अधिकारी व जिल्हा परिषदेमधील काही अधिकारी व रिलायन्स जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झाल्याची चर्चा तालुक्‍यात व जिल्ह्यात चालू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)